भोंदू खरातच्या जीवाला कारागृहात धोका, सरकारी वकिलाच्या दाव्याने खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यायालयीन कोठडीत अर्थात कारागृहात भोंदू अशोक खरात याच्या जीविताला धोका होवू शकतो, असा खळबळजनक दावा सरकारी वकिलांनी केला आहे. यामुळे कारागृहातील सुरक्षेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सहाव्या गुह्यातील खरातची पोलीस कोठडी संपल्याने त्याला व्हीसीद्वारे रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यात त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या कोठडीत कारागृहात रवानगी होते, त्याला तेथे ठेवणे धोक्याचे ठरू शकते, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला सातव्या गुह्यात आजच पोलीस कोठडी द्यावी, सखोल तपास करणेही सोयीचे होईल, असेही सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायालयीन कोठडीत कारागृहात ठेवणे त्याच्या जीवितासाठी धोक्याचे ठरू शकते, या दाव्याने मात्र सर्वच अवाक् झाले आहेत. कारागृहात असलेल्या अन्य कैद्यांच्या सुरक्षेबाबतही आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Comments are closed.