मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान झाला लेकासाठी भावुक…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बाॅलिवुडमध्ये आमिर खानची ओळख ही मिस्टर परफेक्शनिस्ट अशी आहे. परंतु नुकताच हा मिस्टर परफेक्शनिस्ट लेकासाठी मात्र भावुक झाल्याचा पाहायला मिळाला. जुनैद खान आणि साई पल्लवी यांचा ‘एक दिन’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहे. रविवारी मुंबईत या चित्रपटासंदर्भात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये चित्रपटातील कलाकारांसह माध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. याकरता निर्मात्यांनी ‘एक दिन की महफिल’ नावाचा एक संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आमिर खानदेखील उपस्थित होता.

या कार्यक्रमातील आमिर खानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी आमिर खान डोळे पुसत असून, तो अतिशय भावुक झालेला होता. हा चित्रपट आमिर खानसाठी खूप खास असून, त्याचा मुलगा जुनैदने या चित्रपटातून पदार्पण करावे अशी त्याची इच्छा होती. या चित्रपटामध्ये आमिर खानच्या मुलासमोर साई पल्लवी नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, भर कार्यक्रमामध्ये आमिरने साई पल्लवीचे कौतुक केले. यावर अधिक बोलताना तो म्हणाला, “आज आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री साई पल्लवी आहे.” त्याने त्याच्या मुलाच्या कामाचेही यावेळी तोंडभरुन कौतुक केले.

एक दिन या चित्रपटाच्या माध्यमातून साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यानंतर ती ‘रामायण’ या चित्रपटात दिसणार आहेर. रामायण चित्रपटामध्ये तिने सीतेची भूमिका साकारली आहे.

Comments are closed.