ऑनलाईन मागवलेली साडी घेऊन पोहोचला; पेमेंट्स डिटेल्स दाखवतो बोलत मोबाईलवर नको ते व्हिडीओ लावले!
मुंबई क्राईम न्यूज मुंबई: अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक (Mumbai Crime News) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद उपेश अनवर अंसारी असून तो 24 वर्षांचा आहे आणि मालाड मालवणीचा रहिवासी आहे.
नेमकं प्रकरण काय? (Mumbai Crime News)
पोलिसांनी सांगितले की, मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन साडीची ऑर्डर दिली होती. जेव्हा डिलिव्हरी बॉय साडी घेऊन त्या महिलेच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. माझ्यासोबत कोणालातरी पाठवा मी पैसे देतो. मग डिलिव्हरी बॉयने सदर मुलीला सुट्टे पैसे देण्यासाठी खाली बोलावले. आणि ‘पेमेंट डिटेल्स’ दाखवण्याच्या बहाण्याने, त्याने तिला त्याच्या मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. जेव्हा ती मुलगी ओरडायला लागली, त्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली.
घाटकोपरमध्येही धक्कादायक घटना- (Mumbai Crime News)
घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये बाजूलाच राहणाऱ्या नराधमाने अंगणात खेळणाऱ्या मुलींना घरात नेऊन अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच विभागातील संघटनानी संताप व्यक्त केला. पोलिसांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी चार जणांनावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime News)
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
Akluj Crime : आंघोळीचा व्हिडीओ शूट करुन महिलेवर दीड वर्ष अत्याचार; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला अटक
आणखी वाचा
Comments are closed.