धोकादायक फांद्या तोडा; 8 हजार आस्थापनांना पालिकेची नोटीस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वादळी पावसात फांद्या पडून होणारी जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी पालिकेने सोसायटय़ा, आस्थापना, सरकारी कार्यालयांना धोकादायक फांद्या पावसाळ्याआधी तोडण्याबाबत तब्बल 7 हजार 978 नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक नोटीस बोरिवली, अंधेरी, भांडुप विभागात सर्वाधिक नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

पावसाळा दीड महिन्यावर आल्यामुळे पालिकेने पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्या हटवण्यात येत आहेत. यंदाही पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने सर्वे केला. मुंबईत रस्त्यालगत 1 लाख 90 हजार 296 झाडे असून पावसाळ्यापूर्वी 92 हजार 277 झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. 26 हजार 672 झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. उर्वरित 33 हजार 48 झाडांच्या फांद्यांची छाटणी 31 मेपर्यंत उद्यान विभागाकडून पूर्ण केली जाणार आहे.

या ठिकाणी संपर्क साधा

पालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कडेची तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी पालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

Comments are closed.