बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ

टरबूज मृत्यू मुंबई पायधोनी कुटुंब बातम्या: मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) समोर आली होती. या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. (Watermelon Death Mumbai)

सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ- (Watermelon Death Mumbai)

सदर घटनेत आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून, रविवारी उपचारादरम्यान जेजे रुग्णालय येथे त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षांनुसार अन्न विषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Watermelon Death Mumbai)

अन्न व औषध प्रशासनने स्वतंत्र तपास केला सुरू- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन केले जप्त- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)

पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून कोणतेही संशयास्पद संपर्क होते का, याची चौकशी सुरू आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)

डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातमी:

Mumbai Family death Watermelon: मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे ‘फुड पॉयझनिंग’ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज

आणखी वाचा

Comments are closed.