’जीव’, ’एप्रिल मे 99’ कान महोत्सवात! फिल्म बाजार विभागासाठी झाली निवड
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असणा-या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात ’जीव-द क्रियेचर’ आणि ’एप्रिल मे 99’ या दोन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
फ्रान्स येथे 12 ते 22 मे या दरम्यान कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. यामध्ये आयोजन केल्या जाणाऱया फिल्म बाजार विभागात 2016 पासून शासनाच्या माध्यमातून महामंडळ सहभागी होत आहे. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भुरळ पडावी हा यामागचा हेतू आहे.
Comments are closed.