गेल्या 24 तासात काय खलबतं झाली? काय मागण्या केल्या, कशावर झाली चर्चा? शिंदेंसोबत काय बोलणं झालं

मुंबई: राज्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, एकीकडे उमेदवारांच्या नावाच्या घोषणा आणि एकीकडे बैठका, नाराजीनाट्ये आणि बाकी घडामोडीदरम्यान आज प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू ( Bacchu Kadu) हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या २४ तासांमध्ये काय खलबतं झाली, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कोणत्या मागण्या त्यांनी मांडल्या, कोणत्या मागण्या केल्या, याबाबत बच्चू कडूंनी सविस्तरपणे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

Bacchu Kadu Join Shivsena: गेल्या २४ तासात नेमकं काय काय घडलं?

आज माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं, त्याचवेळी पत्रकारांनी विचारलेल्या गेल्या २४ तासात नेमकं काय काय घडलं यावर देखील बच्चू कडूंनी भाष्य केलं आहे. यावेळी कडू म्हणाले,  बच्चू कडू यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांचे महत्त्वाचे मुद्दे मांडले. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सर्व मुद्द्यांवर सहमती दर्शवली. जेव्हा आपल्या कामासाठी सत्ता आणि संघटना पाठिंबा देतात, तेव्हा विरोधात राहण्याची गरज उरत नाही, असे कडू यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मिश्कीलपणे भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले की, “विधान परिषदेची चर्चा किंवा माझी ऑफर मला स्वतःलाही माहित नव्हती, ही सर्व चर्चा मीडियाने आणि त्यांच्या सूत्रांनी सुरू केली. त्यातूनच हा निर्णय घेण्यापर्यंतचा प्रवास झाला”.

२४ तासात एकनाथ शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, तो होत असेल तर विरोध काय असंही पुढे कडू म्हणाले, संघटना या काळात चालवणं फार कठिण आहे,  माझं काम आहे, कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणं, जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा असंही कडू पुढे म्हणाले. प्रहार संघटना राहिलं, ज्याला सामाजिक काम करायचं आहे, त्यासाठी प्रहार राहिलं, तर राजकीय इच्छुकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा पर्याय त्यांनी दिला आहे.

Bacchu Kadu Join Shivsena:  शिंदे सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले…

पेरणीपासून ते कापणीपर्यंतची सर्व कामे मनरेगा (MGNREGS) अंतर्गत आणली जावीत, ही प्रमुख मागणी सरकारने मान्य केली आहे.
शेतमालाच्या हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढा सुरूच राहील. शिंदे सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले, परंतु आता त्याच्या बळकटीकरणासाठी काम करायचे आहे. लाडकी बहीण योजनेतील विधवा भगिनींचे प्रश्न आणि दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल.

Bacchu Kadu Join Shivsena: प्रहार संघटना कायम राहणार

प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना या पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील. ज्यांना सामाजिक काम करायचे आहे ते संघटनेत राहतील, तर राजकीय इच्छुकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा पर्याय त्यांनी दिला आहे बच्चू कडू यांनी आठवण करून दिली की त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतच सुरू झाला होता आणि आता शेवटही शिवसेनेतच व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. मंत्रीपदासाठी किंवा सत्तेसाठी हा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जर मला काही मागायचे असते, तर मी गुवाहाटीला गेल्यावरच मागितले असते. मी पदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी भांडलो आहे,” असे ते म्हणाले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.