Konkan News – उमरे धरणातील पाणी आटल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण
संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणातील पाणी आटल्याने परिसरातील दहा गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. उमरे धरणाला तीन वर्षा पुर्वी गळती लागल्याने या धरणावर अवलंबुन असलेल्या दहा गावाना मार्च पासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मार्च पासून एक ते दोन दिवसाड पाणी पुरवठा सुरु होता. मात्र आज या धरणातील पुर्ण पाणी साठा संपल्याने आज पासून या परिसरातील दहा गावाना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग देवरुख यांनी अचानक काल संध्याकाळी ग्रामपंचायत कार्यालयाना उद्यापासून पाणी येणार नसल्याचे कळवल्याने आता अचानक पाण्याची काय व्यवस्था करायची हा प्रश्न प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाला पडला आहे. यासंबंधी या सरपंचानी पंचायत समिती देवरुख कार्यालयाला कळवले असता तालुक्याला एकच टँकर असल्याचे सांगितले. पुर्ण तालुक्याला एका टँकरने पाणी पुरवठा कसा होणार? येथील दहा गावाना पाणी कसे पुरावायचे हा प्रश्न प्रत्येक सरपंचांना पडला आहे.गेली तीन वर्ष येथील धरणाला गळती लागली असुन यातील पाणीसाठा ५० टक्के कमी केला आहे. पाण्यासारखी गंभीर समस्या असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रशासना विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
Comments are closed.