संगमेश्वर येथील चौपदरीकरणाचे काम बंद करत ठेकेदार कंपनीला ग्रामस्थांनी धारेवर धरले, 5 मे पर्यत कामे न केल्यास दिला इशारा
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामाने येथील व्यापारी वर्ग आणि प्रवासी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. चौपदरीकरण दरम्याने जोड रस्ते, पावसाळ्यात पाण्याची व्यवस्थापन तसेच दुकाने आणि वाडी वस्ती कडे जाणारे रस्ते कामे न केल्याने येथील व्यापारी आणि ग्रामस्थ संतप्त झाले.
व्यापारी आणि ग्रामस्थ एकत्र येत काम बंद करण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांनी आक्रमक रूप घेतल्याने ठेकेदार कंपनीचा मॅनेजरने तेथून पलायन केले ग्रामस्थांनी आक्रमक रूप धरत रस्ता काम बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी मध्यस्थी करत प्रादेशिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांची मध्यस्थी करत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला . ग्रामस्थ संतप्त होत रस्ता काम पुन्हा बंद करण्याचा इशारा दिला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि व्यापारी यांची बुधवारी बैठक झाली . यावेळी व्यापारी संघटना अध्यक्ष तसेच इतर व्यापारी , ग्रामस्थ यांना संबंधित विभागाने उर्वरित कामे ५ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ, व्यापारी शांत झाले मात्र ५ मे पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा रस्ता रोको तसेच चौपदरीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिलेला आहे.
Comments are closed.