जामिनावर सुटताच नराधमाचं भयानक कृत्य, महिलेला धर्मांतरासाठी दबाव अन् जिवे मारण्याची धमकी; कोल्ह

कोल्हापूर क्राईम न्यूज: कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील एका महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच, त्याच भागातील एका गुन्हेगाराने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने पीडित महिलेला पुन्हा गाठून तिचा विनयभंग केला असून, तिला धर्मांतरासाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गैबीसाहेब दस्तगीर लिंगरे (वय 42, रा. शिरोली पुलाची) याला बेड्या ठोकल्या आहेत.

Kolhapur Crime News:  नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गैबीसाहेब लिंगरे याच्यावर संबंधित महिलेने यापूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तो कारागृहात होता, मात्र अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली.

बुधवारी कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेज परिसरात पीडिता जात असताना, लिंगरे याने तिला रस्त्यात अडवले. त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, “जर तू पोलिसात तक्रार केलीस तर तुला मारून टाकीन. पोलीस आणि हिंदुत्ववादी लोक माझे काहीच करू शकत नाहीत,” अशा शब्दात त्याने पीडितेला धमकावले.

Kolhapur Crime News: धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप

पीडित महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तिने धक्कादायक आरोप केले आहेत की, संशयित आरोपी तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. तसेच, हा व्हिडीओ माझा शेवटचा व्हिडीओ असू शकतो. मला भयंकर मानसिक त्रास होत आहे, असे महिलेने म्हटले आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील महिलेने केली आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Kolhapur Crime News:  हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर, कार्यकर्त्यांनी तातडीने पीडितेसह शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी गैबीसाहेब लिंगरे याला अटक केली आहे. शिरोली पुलाची परिसरात एकामागून एक घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा

Virar Crime News: दोन वर्षांपासून प्रेमसंबंध; लग्नाला नकार, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या आईलाही संपवलं, त्यानंतर स्वतःवर वार केले अन्…पोलिसांनी दिली घटनेची माहिती

आणखी वाचा

Comments are closed.