प्रादेशिक पक्ष अधिक मजबूत करून काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असं वातावरण तयार करणं हे काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे कर्तव्य – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काँग्रेसच्या नेतृत्त्वाला आम्ही वारंवार सांगतो की आम्ही दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच प्रादेशिक पक्ष अधिक मजबूत करून काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असं वातावरण तयार करणं हे काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे कर्तव्य आहे असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेने अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तुटपुंजी आहे, त्यात दरवर्षी निवडणुकीत काही गोष्टी आपल्याला वाटून घ्याव्या लागतील. मागची राज्यसभा शरद पवारांना दिली, आताची विधानपरिषद शिवसेनेने घेतली. पुढची विधानपरिषद काँग्रेसने घ्यावी. अशा प्रकारची चर्चा होऊ शकते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मला विचारलं की आम्हाला काय मिळणार? काँग्रेसच्या नेतृत्त्वाला आम्ही वारंवार सांगतो की आम्ही दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे संसदेत नामंजूर झालं, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोठा विजय झाला. त्यात आमचे ९ खासदार काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. 2029 साली जर आम्हाला संधी मिळाली तर आमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान काँग्रेसचाच होईल. त्यामुळे राज्या राज्यातले प्रादेशिक पक्ष अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असे वातावरण तयार करणं हे काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे कर्तव्य आहे असे मी मानतो. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं व्हिजन ठेवा. आम्हाला देशात नेतृत्व परिवर्तन करायचे आहे तेही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली. काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशा वेळेला विधानपरिषदेच्या जागेसाठी किंवा अन्य पदांसाठी आपल्या मित्रपक्षांची संघर्ष होऊ नये ही आमची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नाराजी आम्ही समजू शकतो, तरी चर्चेतून मार्ग निघेल असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना हा महाविकास आघाडीतला हा मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे. प्रत्येकाना आपापल्या भूमिका वठवल्या पाहिजे. अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आणि त्यांना महाविकास आघाडीची सर्व मतं मिळतील असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी आधीच ठरवलं होतं की ते विधानपरिषद निवडणूक लढवणार नाही. काल त्यांनी योग्य वेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला. अंबादास दानवे यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. आणि महाविकास आघाडीची सर्व मतं दानवे यांना मिळतील. आता मुद्दा असा आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासाठी आमचे समर्थ होते आणि दानवे यांचे नाव पुढे आलं असं काँग्रेस म्हणत असेल तर ही बाब अयोग्य आहे. जर 2029 साली सत्ता परिवर्तन झाले तर राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा असेल. जर काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी हे पद नाकारलं तर आम्ही प्रादेशिक पक्ष असे नाही म्हणणार की राहुल गांधींनाच आमचे समर्थन असणार म्हणून. जर राहुल गांधी यांनी जर पद नाकारलं तरी आम्ही पाठिंबा देऊ असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

स्वतःचा पक्ष विलीन करायला मी काय मुर्ख आहे का असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश घेऊन विधानपरिषदेवर जाणार आहेत. याचा अर्थ विधानसभेतून लढून जिंकण्याची त्यांची क्षमता संपली आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Comments are closed.