IPL 2026: मुंबईकडून पुनरागमन होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत…, रविचंद्रन अश्विन स्पष्टचं बोलला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्या आठ सामन्यांत सात पराभवांचा सामना केल्यानंतर सलग सहा सामने जिंकत विजयी षटकार मारला आणि प्लेऑफमध्ये धडक मारली होती. असाच काहीसा चमत्कार करण्याची गरज आता मुंबई इंडियन्सला आहे. मात्र, यंदाच्या हंगामात पाच वेळचा चॅम्पियन असणारा मुंबईचा संघ सध्या 9 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवता आला आहे. तसेच -0.784 चा खराब नेट रनरेटमुळे हार्दिक पंड्याच्या या संघासाठी पुढील वाटचाल अत्यंत कठीण झाली आहे.

मुंबईच्या या कामगिरीवर हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अश्विनच्या मते, यंदा मुंबईकडून पुनरागमन होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना तो म्हणाला की, “माझं मन हे स्वीकारायला तयार नाहीये की मुंबईची अशी अवस्था झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईविरुद्ध 220 धावा केल्या, ज्या इतर कोणत्याही संघाविरुद्ध त्यांना जमल्या नव्हत्या. जेव्हा मुंबई प्रथम गोलंदाजी करते तेव्हा ते 230-240 धावा देत आहेत आणि फलंदाजी करताना त्यांना साधे 208 धावांचे लक्ष्यही गाठता येत नाहीये.” असं अश्विन म्हणाला.

IPL 2026 – ड्रेसिंग रूममध्ये बसून वेपिंग करणं रियान परागला भोवलं! BCCI ने केली कारवाई

मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या मोहिमेत सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध मिळालेला 99 धावांचा मोठा विजय आणि केकेआरवर मिळवलेला विजय वगळता संघाने सर्वत्र निराशा केली आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेला 103 धावांचा मोठा पराभव संघाच्या कमकुवत मानसिकतेचे दर्शन घडवतो. अश्विनच्या मते, मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग सध्या चाचपडत आहेत, विशेषतः घराबाहेर खेळताना त्यांना अद्याप उत्तरांचा शोध लागलेला नाही. आता उर्वरित 6 सामन्यांत सलग विजय मिळवून मुंबई आपला ‘RCB स्टाईल’ चमत्कार घडवते की स्पर्धेतून बाहेर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments are closed.