GT vs RCB: गुजरातचा बंगळुरुवर 4 विकेट्सने एकतर्फी विजय; गिल–बटलरने सामना गाजवला
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 42व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने उत्कृष्ट कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 4 विकेट राखून एक रोमांचक विजय मिळवला. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.
नाणेफेक जिंकून, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी अचूक ठरला. आरसीबीची सुरुवात साधारण झाली. संघाला पाॅवरप्लेमध्येच 2 धक्के बसले, त्यानंतर देवदत्त पडिक्कलने संयमी फलंदाजी करत 40 धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने 28 धावांचे योगदान दिले. मात्र, सातत्याने दबाव कायम ठेवत, गुजरातच्या गोलंदाजांनी आरसीबीचा डाव 19.2 षटकांत 155 धावांवर गुंडाळला.
गुजरातकडून, अर्शद खानने भेदक गोलंदाजी करत 3 महत्त्वपूर्ण विकटे्स मिळवले. त्याला जेसन होल्डर आणि राशिद खान यांची उत्तम साथ लाभली. या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेत योगदान दिले, ज्यामुळे आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातची सुरुवात भक्कम झाली. गिल आणि साई सुदर्शन यांनी 42 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत पाया दिला. सुदर्शन 6 धावांवर बाद झाला, त्यानंतर गिलने 18 चेंडूत 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
मधल्या फळीत, जोस बटलरने आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 19 चेंडूंत 39 धावा कुटल्या आणि सामन्याची गती गुजरातच्या बाजूने वळवली. मात्र, जेव्हा गुजरातची धावसंख्या 111/5 अशी खालावली, तेव्हा सामना एका तणावपूर्ण वळणावर येऊन पोहोचला.
या निर्णायक क्षणी, राहुल तिवेटिया आणि जेसन होल्डर यांनी पुढाकार घेत जबाबदारी स्वीकारली. त्यांनी 36 धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. होल्डरने 12 धावा केल्या, तर तिवेटिया 27 धावांवर नाबाद राहिला आणि त्याने आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.
आरसीबीकडून, भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीत छाप पाडली. ज्याने ३ विकेट घेतले. रोमारियो शेफर्ड आणि सुयश शर्मा यांनीही प्रयत्न केले आणि अनुक्रमे 2 व 1 बळी घेतला, परंतु ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
Comments are closed.