महाराष्ट्र दिनी चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्यालाही मोठी झळाळी, पाहा आजचे ताजे दर

आज सोन्याचांदीचा भाव: आज 1 मे 2026, महाराष्ट्र दिनी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे चांदीच्या दरात प्रति किलो 5,000 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे, तर सोन्याच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Gold Price Today: सोन्याचे आजचे दर

भारतात आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 22 रुपयांची वाढ होऊन तो 15,066 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 12,810 रुपये झाला आहे. 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्यासाठी आता दीड लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे.

Gold Price Today: प्रमुख शहरांतील 10 ग्रॅम सोन्याचे दर (24 कॅरेट)

मुंबई: रु. 1,50,660

कोलकाता: रु. 1,50,660

बेंगळुरू: 1,50,890 रुपये

चेन्नई: 1,51,640 रुपये

Silver Price Today: चांदीच्या किमतीत मोठी तेजी

चांदीच्या किमतीत आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 10 ग्रॅम चांदीचा दर 50 रुपयांच्या वाढीसह 2,550 रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा दर आज थेट 5,000 रुपयांनी वधारून 2,55,000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. चेन्नई आणि हैदराबादसारख्या दक्षिण भारतीय शहरांमध्ये तर चांदीचा दर 2,65,000 रुपये प्रति किलो इतका आहे.

Gold Price: दर वाढण्यामागचे आंतरराष्ट्रीय कारण

जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 4,600 डॉलरच्या वर गेला आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत होणे आणि विशेषतः इराण व अमेरिका यांच्यातील वाढता तणाव यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 2 टक्क्यांची वाढ झाली असून त्याचे थेट पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटले आहेत.

सोन्या-चांदीचा आजचा भाव: 22 आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे नेमकं काय?

दरम्यान, वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14  अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा

New Labour Laws 2026: दरमहा 50000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार? नव्या नियमांमुळे तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.