अजितदादांच्या आठवणींनी बीडमध्ये सुनेत्रा पवार भावूक; माध्यमांशी बोलताना कंठ दाटला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र दिनानिमित्त बीड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आल्या होत्या. त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथे शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला.

सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील, देशातील आणि परदेशातील लोकांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बौद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा देते. अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आले आहे. खरे तर हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. माझ्या हस्ते आज ध्वजारोहण पार पडले. बीडच्या जनतेला एवढेच सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बघितलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन, असे यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Comments are closed.