बाळ गर्भातच दगावलं; सासरच्या मंडळींचा छळ वाढला अन्…; नागपुरात माय-लेकीचं टोकाचं पाऊल, नेमकं क
Nagpur Crime : नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कुटुंबातील माय-लेकीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून (Nagpur Crime News) सून व तिच्या आईने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. आकांक्षा बर्म्हे (इंजिनिअर) व तिची आई संगीता श्रीराम ढबाले (शिक्षिका) अशी मायलेकींची (Nagpur Crime News) नावे आहेत. दोघीनींही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.(Nagpur Crime News)
Nagpur Crime News : काही दिवसाआधी तिचे बाळ गर्भातच दगावले
आकांशा ही प्रेग्नेंट होती, काही दिवसाआधी तिचे बाळ गर्भातच दगावले होते, त्यानंतर सासरच्या मंडळींचा त्रास (Nagpur Crime News)आणखी वाढला, याचा त्रासाला कंटाळून दोघींनी आत्महत्या (Nagpur Crime News)केली असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास या दोघींनीही आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास (Nagpur Crime News)घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. (Nagpur Crime News)
Nagpur Crime News : आकांक्षाच्या सासरच्या मंडळींची चौकशी सुरू
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. माय-लेकींच्या मृत्यूमागे सासरच्या छळाचा मोठा वाटा असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकांक्षाच्या सासरच्या मंडळींची चौकशी सुरू केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. माय-लेकींच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.(Nagpur Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.