मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितली प्रवाशांची माफी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील ‘मिसिंग लिंक’ हा मार्ग 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचे उद्घाटन केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर झालेल्या वाहतूक कोंडीबाबत प्रवाशांची माफीही मागितली.

मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवाशांची माफी मागितली. “खरे म्हणजे मला आज मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे. त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडकले होते. सुप्रिया सुळेही ट्रॅफिक जाममध्ये अडकल्या होत्या आणि तिथून त्यांनी एक व्हिडीओही काढला. त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला. सुप्रियाताई तुम्ही शेवटचे ट्रॅफिकमध्ये अडकल्या आहात. आता ‘कनेक्टिंग लिंक’ झालेली आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Video – मिसिंग लिंकच्या उद्घाटनाआधी मुंबई-पुणे महामार्ग जाम; सुप्रिया सुळे 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या

मिसिंग नाही ‘कनेक्टींग’ लिंक!

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील या प्रकल्पाला मिसिंग लिंक असे म्हटले जात आहे. मात्र याला मिसिंग लिंक नाही तर कनेक्टींग लिंक नाव द्या. कारण नथिंग इज मिसिंग, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाचे नाव बदलले आहे.

Comments are closed.