दिवसेंदिवस राज ठाकरेंची भूमिका बदलतेय, त्यांनी एकदा मराठीविषयी भूमिका स्पष्ट करावी : सरनाईक

प्रताप सरनाईक राज ठाकरेंवर राज ठाकरे यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत जात आहे, असं म्हणत मराठी भाषेच्या मुद्यावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. मागे काही दिवसाखाली राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनीच हिंदी भाषिकांना हिंदी शिकवण्यासाठी क्लास सुरु केले होते. राज ठाकरेंनी मराठी विषयी एकदा भूमिका स्पष्ट करावी, तुम्ही कधी म्हणतात त्यांना मराठी कशाला शिकवायची, ही बदलती भूमिका योग्य नसल्याची टीका सरनाईक यांनी राज ठाकरेंवर केली.

महाराष्ट्रात आपणच जर रिक्षा चालकाला हिंदी बोलत असू तर त्यांना मराठी कधी येणार?

राज ठाकरे यांनी मराठीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे जगभरात मराठी भाषा पोहोचेल. ज्या हिंदी भाषिक नेत्यांनी आमच्याकडे मुदत मागतली होती, त्यासाठी आम्ही त्यांना 100 दिवसांची मुदत दिली आहे. महाराष्ट्रात आपणच जर रिक्षा चालकाला हिंदी बोलत असू तर त्यांना मराठी कधी येणार? असा प्रश्न देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला.  दरम्यान आज धाराशिव येथे प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, यावेळी माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?

प्रताप सरनाईक यांनी आता 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत चाकलांना मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवतो का ते पाहिले जाणार आहे. जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र मराठी भाषेबाबत 15 ऑगस्टपर्यंत आकारणार नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले. रिक्षा आणि टॅक्सी (Taxi-Auto) चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य निर्णयाच्या या भूमिकेवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात काल वरूणराज भिडे स्मृती पुरस्कार राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या मराठी शिकवण्यावर भाष्य केलं. जिथली माती भुसभुशीत असते तिथे घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र येऊन खडकासारखं कडक उभं राहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. (Raj Thackeray On Marathi Compulsory Auto Taxi)

परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

आजपासून म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईतील अनेक चालक-मालक संघटनांनी आक्षेप घेत 4 मे रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ज्या हिंदी भाषिक नेत्यांनी आमच्याकडे मुदत मागतली होती, त्यासाठी आम्ही त्यांना 100 दिवसांची मुदत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

राज्यकर्त्यांचं मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; मुंबईतील ‘भैय्यांना’ मराठी शिकवणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं

आणखी वाचा

Comments are closed.