Chhatrapati Sambhaji Nagar News – टेंभापुरी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र दिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी टेंभापुरी धरणावर गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (01 एप्रिल 2026) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव-वाळूज शिवारातील या धरणावर रांजणगाव शेणपुंजी येथील ८ ते १० तरुण रिक्षाने आले होते. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने मौजमजेसाठी गेलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला.

या दुर्घटनेत शैलेश जोगदंड (वय २५), शैलेश वेळेसकर (वय २४) आणि आविष्कार लोखंडे (वय २५) या तिघांना आपले प्राण गमवावे लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अशोक खांडेकर, हरिभाऊ घुगे, वैभव बाकडे आणि वसीम पठाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. वाळूज पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा केला असून, या घटनेमुळे रांजणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments are closed.