अत्याचार करुन चार वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, धक्कादायक घटनेनं भोर हादरलं, नराधमाला अटक

गुन्हे बातम्या ठेवा: पुण्यातील भोर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्यातील एका गावात एका चार वर्षाचा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपीने चिमुरडीची हत्या केली आहे. या घटनेनंतर मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे.  कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपीने अत्याचार करुन दगडाने चिमुकलीची हत्या केल्याची माहिती

आरोपीने अत्याचार करुन दगडाने चिमुकलीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  65 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, दगडाने ठेचून तीचा खून केल  आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला होता. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले cctv फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! चुलत्यानेच 13 महिन्याच्या चिमुकलीचे तुकडे करुन जमिनीत पुरले, धाराशिव हादरलं, आरोपीला अटक

आणखी वाचा

Comments are closed.