लिव्हरची व्याधी असलेल्या २५० रुग्णांचा पुनर्जन्म, अपोलो रुग्णालयाने दिले जीवदान
लिव्हरची व्याधी असलेल्या 250 रुग्णांना नवी मुंबईत पुनर्जन्म मिळाला आहे. लिव्हर खराब झालेल्या या रुग्णांच्या मदतीसाठी अपोलो रुग्णालय देवदूत म्हणून धावून आले असून या सर्व रुग्णांना जीवदान मिळाले आहे. या सर्वच रुग्णांवर लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात 2017 पासून लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. पहिल्या शस्त्रक्रियेच्या टप्प्यात नवी मुंबईतील एका वडिलांनी आपल्या 16 वर्षीय मुलाला यकृताचा एक भाग दान केला होता. त्यानंतर रुग्णालयात 250 लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. वर्षानुवर्षे या उपक्रमाद्वारे सर्वात गुंतागुंतीची प्रकरणे हाताळली गेली आहेत. ज्यात एका वर्षाखालील बालकाच्या लिव्हर प्रत्यारोपणाचाही समावेश आहे, अशी माहिती अपोलो रुग्णालयाचे नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड डॉ. किरण शिंगोटे यांनी सांगितले.
अपोलो रुग्णालयाचे कौशल्य केवळ देशातील रुग्णांनाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरातील रुग्णांनाही आकर्षित करीत आहे. येमेन, केनिया, टांझानिया, ओमान, सौदी अरेबिया आणि सुदान येथील रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत.
250 यकृत प्रत्यारोपणाचा टप्पा गाठणे हा केवळ एक आकडा नाही, तर 250 लोकांना नवंजीवन देण्याचे आणि कुटुंब पुन्हा जोडण्याचे एक प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अपोलो रुग्णालयाचे एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख सल्लागार आणि युनिट हेड डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.