Chakan Crime News : पुण्यातील चाकण हादरलं! तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार करुन संपवलं, 16

गुन्ह्याच्या बातम्या टाका: पुणे जिल्ह्यातील भोर (Pune Bhor Crime News) तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे खून करण्यात आली आहे. ही घटना काल घडली आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. चाकणच्या (Chakan) म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या (Mahalunge South Police Station) हद्दीत तीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं सर्वत्र संतप व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहार राज्यातील असलेल्या एका सोळा वर्षे अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेश मधील असून कामनिमित्तानं चाकण परिसरात वास्तव्यास होते. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, कालच भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिला संपवल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आज लगेच पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करुन त्याला संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला फाशी देण्याची मागणी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Bhor Crime News) करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या (Bhor Crime News)अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघून असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे गावातील वातावरण तापलं असून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या:

Bhor Crime News : गोठ्याकडील सीसीटीव्हीत चिमुरडी शेवटची दिसली, नराधमाची हादरवणारी कबुली, मृतदेह शेणात लपवला, नसरापूर प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

आणखी वाचा

Comments are closed.