आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, नसरापूर अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल घडली आहे. यानंतर ग्रामस्थांसह नातेवाईक आक्रमक झाले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर करावी अी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या मागणीसाठी बंघळुरु-पुणे महामार्ग आंदोलकांनी रोखला आहे. दरम्यान, याप्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगानं म्हटलं आहे.
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश
फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी अशी माहिती महिला आयोगाने दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील नसरापूर प्रकरणाची दखल घेतली आहे. महाराष्ट्रात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्यंत क्रूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) आज स्वतःहून दखल घेतली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवताना आयोगाने सांगितले की, हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. या अमानवीय गुन्ह्याने संपूर्ण देशात वेदना व संताप निर्माण झाला आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला (NCPCR) या प्रकरणात तातडीने संज्ञान घेण्याचे व तपासावर बारकाईने देखरेख ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई मिळावी, POCSO कायद्यांतर्गत विहित मुदतीत दोषारोप पत्र (चार्जशीट) दाखल व्हावे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी, असा आग्रह आयोगाने धरला आहे.
Bhor Crime : 1 मे रोजी 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करुन तिची हत्या केली
भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये शुक्रवारी, 1 मे रोजी एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी पुण्यातील नवले पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं. चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
Navale Bridge Protest : पोलीस आयुक्तांशी चर्चा
नसरापूर आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.
आणखी वाचा
Comments are closed.