अर्जुन तेंडुलकरवर पाच पटीने बोली, टी-20 मुंबई लीगच्या लिलावात आयरा जाधवही चमकली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई इंडियन्सने सोडचिठ्ठी दिलेल्या अर्जुन तेंडुलकरवर टी-20 मुंबई लीगच्या लिलावात तब्बल पाच पटीने बोली लागल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदाच टी-20 मुंबई लीगमध्ये महिलांचे सामने होणार आहेत. त्यामुळे महिला खेळाडूंचा लिलाव यावेळी पहिल्यांदाच झाला. महिलांच्या लिलावात बाजी मारली ती युवा आयरा जाधवने.

अर्जुनला यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबेची साथ मिळणार आहे. कारण एआरसीएस अंधेरीच्या संघाने अर्जुनवर मूळ किमतीच्या पाच पट जास्त बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. शिवम दुबे या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.

महिलांचे हे पहिलेच पर्व आहे. या पर्वाच्या लिलावात आयरा जाधव चमकली. कारण या लिलावात सर्वाधिक बोली लागली ती आयरावर. आकाश टायगर्स या संघाने दहा लाख रुपये खर्च करत आयराला आपल्या संघात दाखल करून घेतले. आयराने गेल्या वर्षी 19 वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले होते. महिला क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी ती पहिलीच खेळाडू ठरली होती. त्यामुळे आयराला या लिलावात सर्वाधिक बोली लागल्याचे पाहायला मिळाले.

Comments are closed.