सीएसकेच्या विजयाचे 5 हिरो! ऋतुराज गायकवाड-कार्तिक शर्मा चमकले; मुंबईची पलटन भरकटली
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सवर सलग दुसऱ्यांदा वर्चस्व गाजवत दमदार विजय मिळवला आहे. चेन्नईच्या गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी करत मुंबईला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सने संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत 18.1 षटकांत फक्त 2 विकेट्स गमावत 160 धावा करून 11 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले.
सीएसकेच्या विजयाचे 5 हिरो:
आशुनल कंबोज वेगवान गोलंदाज अशुंल कंबोजने 4 षटकांत 32 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. विल जॅक्स, हार्दिक पांड्या आणि रॉबिन मिंज यांना बाद करत त्याने मुंबईची गती रोखली.
नूर अहमद स्पिनर नूर अहमदने 4 षटकांत 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. रयान रिकेल्टन आणि तिलक वर्मा यांना बाद करत त्याने मधल्या षटकांत मुंबईला धक्का दिला.
जेमी ओव्हर्टन डेथ ओव्हर्समध्ये जेमी ओव्हर्टनने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकांत फक्त 23 धावा दिल्या. त्याने नमन धीरचा महत्त्वाचा बळी घेतला.
ऋतुराज गायकवाड कर्णधार ऋतुराजने 48 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी करत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. संघाला स्थिरता देत त्याने विजयाची दिशा ठरवली.
कार्तिक शर्मा युवा फलंदाज कार्तिक शर्माने 40 चेंडूत 54 धावा करत सर्वांचे लक्ष वेधले. ऋतुराजसोबत त्याने 98 धावांची निर्णायक भागीदारी केली.
या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
Comments are closed.