IPL 2026 – 14 कोटींची बोली, MI विरुद्ध मॅचविनिंग खेळी अन् धोनीसारखं गन सेलीब्रेशन, चेपॉक गाजवणारा कार्तिक शर्मा कोण आहे?
आयपीएलमध्ये शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम मैदानावर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या पारंपरिक संघांत सामना रंगला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि 20 वर्षीय कार्तिक शर्माने अर्धशतकीय खेळी केली. ऋतुराजने 48 चेंडूत 67, तर कार्तिकने 40 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी करत चेन्नईला यंदाच्या हंगामातील चौथा विजय मिळवून दिला.
मुंबईने विजयासाठी दिलेले 160 धावांचे आव्हान चेन्नईने 18.1 षटकांमध्ये पूर्ण केले. या सामन्यात चेन्नईचा युवा खेळाडू कार्तिक शर्मा चांगलाच चमकला. कर्णधार ऋतुराजसोबत तो खेळपट्टीवर नांगर टाकून बसला आणि संघाला विजयी करूनच मैदानाबाहेर आला. मुंबईविरुद्ध कार्तिकने केलेल्या फलंदाजीचे कौतुक सुरू असतानाच त्याच्या गन सेलीब्रेशनचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हे सेलिब्रेशन पाहताच चाहत्यांना थेट 2005 मधील महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली. धोनीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावांच्या ऐतिहासिक खेळीदरम्यान अशाच प्रकारे जल्लोष केला होता.
मी हे सेलिब्रेशन आधीच ठरवले होते. ही कोणाचीही नक्कल नसून माझी स्वतःची स्टाईल आहे, असे सामन्यानंतर बोलताना कार्तिक म्हणाला. मात्र चाहत्यांसाठी हे सेलिब्रेशन धोनीच्या आठवणींना उजाळा देणारेच ठरले.
कार्तिकला चेन्नई सुपर किंग्सने मिनी लिलावात 14.20 कोटी रुपयांची मोठी बोली लावून संघात सामील केले होते. आपली निवड सार्थ ठरवत अवघ्या 20 व्या वर्षी अर्धशतक झळकावून कार्तिक चेन्नईसाठी आयपीएलमध्ये 50 धाव करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. दबावाच्या परिस्थितीत त्याने दाखवलेला आत्मविश्वास आगामी काळातील मोठ्या खेळाडूची नांदी मानली जात आहे.
स्वतंत्र प्रेस हा लोकशाहीचा आवाज आहे, पण आज त्या आवाजावर हल्ला होत आहे. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक 157 आहे, जो “अत्यंत गंभीर” श्रेणीमध्ये येतो.
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस पक्ष सत्य बोलणाऱ्या प्रत्येक निर्भय आवाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे… pic.twitter.com/qbluVtzaqW
— काँग्रेस (@INCIndia) ३ मे २०२६
कोण आहे कार्तिक शर्मा?
कार्तिक शर्मा राजस्थानचा यष्टीरक्षक बॅटर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने तळाला येत विस्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी लीग स्टेजमध्ये त्याने 5 लढतीत 160 च्या सरासरीने 133 धावा केल्या. 12 टी-20 लढतीत त्याने 160 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपलेल्या आहेत.
Comments are closed.