देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावानं; अजितदादांचा रेकॉर
Sunetra Pawar breaks All record Baramati results : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विजयाकडे मोठी झेप घेतली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत माजी आमदार अजित पवार यांच्या २०१९ मधील मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत नवा रेकॉर्ड बनवला आहे. २४ च्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा विक्रमी विजय झाला आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, जय पवार आणि पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडणून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याचबरोबर सर्व पक्षांनी आणि संघटनांनी देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मते देखील पडली नसल्याचं दिसून येत आहे. करूणा मुंडे यांना 125 मते मिळाली आहेत, तर अभिजित बिचुकले यांना 121 मते मिळाली आहेत.
Sunetra Pawar Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला
बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहेत.
तर सुनेत्रा पवारांना मिळालेल्या विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, आज रेकॉर्ड मताने निवडून आलो त्यांचे आभार. निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे वाटले नव्हते. आम्हाला कुणालाही वाटत नाही आज आनंदाचा दिवस आहे. कुणीही जल्लोष करू नये. 2029 ची तयारी नाही. मी इथे लोकांसाठी असेल, जनता दरबार घेईल. आचारसंहिता संपल्यावर मी जनता दरबार घेईल, अशी माहिती देखील पार्थ पवारांनी दिली आहे.
Sunetra Pawar Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
बारामतीकरांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे, असं सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची..! असं म्हणत सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना विकासाचा विश्वास दिला आहे. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया अशी विनंती सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची.. ! असा विश्वासही सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.