प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल…, रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबा

Ashok Kharat and Rupali Chakankar: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांना समन्स बजावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर आज चौकशीसाठी ईडी (ED) कार्यालयात हजर झाल्या असून त्यांची चौकशी केली जात आहे.

Ashok Kharat and Rupali Chakankar: काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत अशोक खरात याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. खरातने 134 हून अधिक ‘प्रॉक्सी’ (बनावट) खाती चालवल्याचे समोर आले आहे. या पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांची चार बँक खाती असून, गेल्या काही वर्षांत या खात्यांमधून 2 कोटी 20 लाख ते 2 कोटी 40 लाख रुपयांपर्यंतचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे. हे सर्व व्यवहार अशोक खरातशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Ashok Kharat and Rupali Chakankar: कॉल डिटेल्स आणि मेसेजमुळे अडचणीत वाढ

प्रतिभा चाकणकर यांनी अशोक खरातशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक माहिती समोर आणली आहे. 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या काळात प्रतिभा चाकणकर आणि खरात यांच्यात 236 वेळा संवाद झाला आहे. यात चाकणकर यांनी खरातला केलेले 218 मेसेजेस तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तसेच, त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याचेही खरातशी 37 वेळा कॉलवर बोलणे झाल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Ashok Kharat and Rupali Chakankar: पोलिस चौकशीनंतर आता ईडीचा फास

यापूर्वी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची तब्बल 8 तास चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने आता ईडीने या प्रकरणात उडी घेतली आहे. या चौकशीत प्रतिभा चाकणकर पैशांच्या स्त्रोताबाबत काय माहिती देतात आणि खरातशी असलेल्या आर्थिक संबंधांवर काय स्पष्टीकरण देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Nashik Court Hearing: ‘अवतार पूजा कर, नाहीतर मृत्यू अटळ’, खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, न्यायाधीशांनी घेतला मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.