Solapur News – अक्कलकोटहून गाणगापूरला जाणाऱ्या बसला डंपरची धडक, दोघांचा मृत्यू
अक्कलकोट होऊन गाणगापूरकडे जाणाऱ्या बसला मुरुमाने भरलेल्या डंपरने धडक दिली. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी काही प्रवासी गंभीर आहेत. रुद्देवाडी बस स्थानकाजवळ सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धडकेनंतर डंपर काही अंतर जाऊन उलटला. त्यानंतर डंपरला भीषण आग लागली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
Comments are closed.