डोंबिवलीत धक्कादायक घटना!  तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता, पोलिसांकडून तपास सुरु

डोंबिवली बातम्या: डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. आई तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून बेपत्ता झाली आहे.  खाऊ आणायला जाते असे सांगून गेलेली आई पुन्हा परतली नाही. आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच सोडून आई बेपत्ता झाली आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याने तत्परता दाखवत मुलांना सुरक्षित पोलीस ठाण्यात पोहोचवले आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे.

डोंबिवली पश्चिमेतील तुळशीराम बंगल्याजवळ धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या परिसरात  खाऊ आणायला जाते असे सांगून गेलेली आई आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच सोडून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक मुलगा दोन मुली असून हे चार ते पाच वर्षे वयोगटातील असल्याची माहिती आहे. दरम्यान बराच कालावधी उलटूनही आई परत आली नाही त्यामुळे मुले कासावीस झाली होती.  काही नागरिकांनी या मुलांवर विचारपूस केले, मात्र त्यांना काही सांगता येत नव्हते. फक्त आई खाऊ आणायला गेली इतकच ते सांगत होते. यामधील एका महिलेने शिवसेनेच्या कार्यकर्ता जयश्री यादव यांना या घटनेची माहिती दिली. जयश्री यादव यांनी या तिन्ही मुलांना घेऊन थेट विष्णू नगर पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या तिन्ही मुलांना ताब्यात घेत त्यांच्या आईचा शोध सुरू केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत .

आणखी वाचा

Comments are closed.