IPL 2026 – रोहित शर्माचा दिलदारपणा; सराव करताना चेंडू ग्राउंडसमनला लागला, धावतपळत जवळ गेला अन्…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यापूर्वी सराव करताना रोहित शर्माने माणुसकीचे दर्शन घडवले. वानखेडे स्टेडियमवर सरावादरम्यान रोहितने मारलेला एक जोरात फटका तिथे काम करणाऱ्या सिबान बिस्वास नावाच्या कर्मचाऱ्याच्या गुडघ्याला लागला. चेंडू लागताच रोहितने आपला सराव अर्धवट सोडला आणि धावत त्या कर्मचाऱ्याकडे गेला. जोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला प्रथमोपचार मिळत नाहीत, तोपर्यंत रोहित तिथून हलला नाही. त्याने स्वतः त्याच्यासाठी आईस पॅक, स्प्रे आणि औषधे मागवली.

जखमी झालेला कर्मचारी सिबान म्हणाला की, “वेदना होत होत्या, पण रोहित शर्मा यांनीदाखवलेली आत्मीयता आणि त्यांची हस्तांदोलन करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप खास होते.

दरम्यान, स्वतः हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत असूनही रोहितने एका सामान्य कर्मचाऱ्याला दिलेले हे प्राधान्य सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे. तसेच लखनौ विरुद्ध लढतीत रोहित शर्मा इंपॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे.

Comments are closed.