IPL 2026 – मुंबई इंडियन्सला मोठा झटका! दुखापतीमुळे हार्दिक पंड्या बाहेर; हिटमॅनचे कमबॅक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या अडचणी संपण्याचे नाव नाही. सोमवारी वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या या लढतीत मैदानात उतरला नाही.

नाणेफेकीच्या वेळी हार्दिकच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्यात आले. हार्दिक पंड्याला पाठ दुखीचा त्रास होत असल्याने लखनौ विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी ‘मिस्टर 360’ सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. टॉस जिंकल्यानंतर सूर्याने सांगितले की, हार्दिकची प्रकृती ठीक नसल्याने आज मी त्याच्या भूमिकेत आहे.

रोहित शर्माचे पुनरागमन आणि संघात मोठे बदल

हार्दिक बाहेर असला तरी मुंबईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टार फलंदाज रोहित शर्मा अखेर मैदानात परतला आहे. 12 एप्रिलपासून दुखापतीमुळे बाहेर असलेला रोहित आज ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरला आहे. हार्दिकच्या जागी अष्टपैलू राज बावाला संघात स्थान मिळाले आहे. ट्रेंट बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉशला संधी देण्यात आली आहे, तर दीपक चहरचे संघात पुनरागमन झाले आहे.

Comments are closed.