Video पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवाभाऊंची ममता दीदींवर टीका, म्हणाले..
मुंबई : देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा (विधानसभा) निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने (BJP) देशभरात जल्लोष सुरू केला असून मुंबईसह महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी देखील आनंदोत्सव केला. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनीही एकत्र येत रसगुल्ला वाटून विजयोत्सव साजरा. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येथून विजयबद्दल आनंद व्यक्त करत हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातील जवळपास 6 हजार बंगाली कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन रात्रंदिवस काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जो विजय मिळाला, तो राष्ट्रीयत्त्वाचा विजय आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं. तर, हे परबोर्तन नसून महापरिबोर्तन असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
मी जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो, त्यावेळी एका पत्रकाराने मला विचारलं की, निवडणुकांवेळी ममता बॅनर्जी म्हणतात भाजपचे लोक हे पश्चिम बंगालच्या बाहेरचे आहेत. मात्र, मी पत्रकारांना सांगितली की, भाजपची स्थापना ज्यांनी केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच पश्चिम बंगालचे होते, त्यामुळे खऱ्या बंगालचा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आज बंगलाच्या जनतेनं दीदींना दाखवून दिलं, बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन बंगालमध्ये पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन करुन दाखवलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
बंगाल, आसाम, पद्दुचेरीतील हा विजय भारतीयांचा मोदींवर असलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. आजही जनतेला एकच गोष्ट माहितीय, मोदी है तो मुमकीन है… अशी घोषणाबाजीही फडणवीसांनी केली. बंगालमधून कुशासन बाहेर काढण्याचं काम 30 वर्षे काँग्रेस, 36 वर्षे कम्युनिष्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्षे ममता दीदीचं शासन होतं. बंगालची अवस्था या सर्व राज्यकर्त्यांनी कमी करुन ठेवली, असे म्हणत आता परिवर्तन झाल्याचं फडणवीसांनी महटलं. ममतादीदी तुम्ही कितीही अत्याचार केला, तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही थांबवू शकणार नाही, असा हा आजचा विजय आहे. आज केवळ भाजप जिंकली नाही, तर संपूर्ण भारत जिंकला आहे. आसामप्रमाणे आता बंगालही भारताच्या वाटचालीत निर्णयाक भूमिका बजावेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
ममता बॅनर्जींना जनतेची चपराक – विखे पाटील
पश्चिम बंगालमध्ये आता जंगल राज संपले आहे. पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य शिल्लक राहिले नव्हते अशीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ही मांडली होती. पश्चिम बंगाल म्हणजे घुसखोरचा प्रांत झाला होता, या घुसखोरीमुळे देशाला अंतर्गत धोका निर्माण झाला होता. ठराविक समाजाच्या मतासाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या जनतेने चांगलीच चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंगालच्या विजयानंतर व्यक्त केली.
हेही वाचा
पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपची मुसंडी, कोणत्या राज्यात कोण जिंकलं?
आणखी वाचा
Comments are closed.