हार्दिक पांड्या IPL 2026 मधून बाहेर पडल्यास 'हे' 5 खेळाडू ठरू शकतात त्याचे पर्याय! जाणून घ्या सविस्तर

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या (LSG) सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ आपला नियमित कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik pandya) याच्याशिवाय मैदानात उतरला. पाठदुखीमुळे हार्दिकला या सामन्यातून बाहेर पडावे लागले असून, त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघाचे नेतृत्व करत आहे.
जर हार्दिकची दुखापत गंभीर असेल आणि तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकला नाही, तर मुंबई इंडियन्स खालील 5 खेळाडूंपैकी एकाला ‘रिप्लेसमेंट’ (पर्यायी खेळाडू) म्हणून संघात घेऊ शकते.

विजय शंकर
अनुभवी अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आयपीएल 2026 च्या लिलावात अनसोल्ड (विकला न गेलेला) राहिला होता. हार्दिकच्या जागी तो मुंबईसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

महिपाल लोमरोर
स्पिन ऑलराउंडर महिपाल लोमरोर हा मुंबईसाठी उत्तम पर्याय आहे. तो खालच्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करण्यासोबतच मधल्या ओव्हर्समध्ये गोलंदाजीही करू शकतो.

दीपक हुडा
मुंबईची फलंदाजी सध्या काहीशी डळमळीत दिसत आहे. अशा वेळी मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज दीपक हुड्डा याला संघात स्थान दिले जाऊ शकते. तो लिलावात विकला गेला नव्हता, पण त्याच्याकडे आयपीएलचा मोठा अनुभव आहे.

अभिनव मनोहर
खालच्या क्रमांकावर फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाच्या शोधात असलेली मुंबई ‘अभिनव मनोहर’चा विचार करू शकते. या सीझनमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यास भविष्यातही तो संघाचा भाग राहू शकतो.

सलमान निझर
‘मॅच फिनिशर’ म्हणून सलमान निझार हा एक सक्षम पर्याय आहे. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा काढण्याची कला त्याला अवगत असल्याने मुंबई इंडियन्स त्याच्यावर लक्ष ठेवून असेल.

Comments are closed.