लाडक्या थलापतीचा पराभव होतोय, अफवा ऐकून जबरा फॅनला धक्का; गळ्यावरुन चाकूच फिरवला, घडलं काय?

कृष्णगिरी विजय समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. तामिळनाडूतील जनता सध्या विधानसभा निवडणुकींच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay)  हे विधानसभा निवडणुकीत (Election) आपलं नशीब आजमावत आहे. विजय हे जवळपास 36 वर्षे सिनेसृष्टीत सक्रीय होते.  एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.  त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, रॅली, रोड शोमध्ये विजय यांच्या चाहत्यांचा जनसागर उसळायचा.  परंतु, निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी एका विजयच्या चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  आपल्या नायकाचा पक्ष विधानसभा निवडणुकीत हरेल, या भीतीपोटी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीच्या कलांनुसार, टीव्हीके पक्षाला अधिक बंपर मते मिळाली.

थलापती विजय यांच्या चाहत्याचे नाव महेंद्रन (वय वर्ष 28) असे आहे. टीव्ही 9 तामिळच्या रिपोर्ट्सनुसार,  टीव्हीके पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव होईल, या अफवावंर विजय यांच्या चाहत्याने विश्वास ठेवला.  या अफवांवर विश्वास ठेवत त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.   मतमोजणीपूर्वीच अभिनेत्याच्या चाहत्याने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला.  मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रन हा तामिळनाडूतील कृष्णगिरीचा रहिवासी आहे.

महेंद्रन  आपल्या घराबाहेर चाकू घेऊन उभा होता.  अचानक त्यानं चाकूने आपला गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.    तसेच त्याला तात्काळ कृष्णगिरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माहितीनुसार, महेंद्रनवर सध्या उपचार सुरू आहेत.

थलापती विजयच्या चाहत्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला (Krishnagiri Vijay supporter tries to kill himself before election results)

हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.  पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की,  मतमोजणी होण्यापूर्वीच   कृष्णगिरी परिसरात टीव्हीकेच्या  पराभवाच्या अफवा पसरल्या होत्या.  यामुळे महेंद्रन खूप अस्वस्थ झाला होता. परिणामी, त्यानं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

सध्या मतमोजणी सुरू आहे. तामिळनाडूच्या 234  विधानसभा जागांचे कल दर्शवतात की,  टीव्हीके 112 जागांवर आघाडीवर आहे. अंतिम निकाल काही तासांत समोर येतील. एडडीएमके 75 जागांवर आणि डीएमके 50 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, हे सुरुवातीचे कल आहेत, अंतिम निकाल वेगळा असू शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पहिल्याच निवडणुकीत थलापतींचा मोठा ‘विजय’; रुमर्ड गर्लफ्रेंड तृषाला राहवेना, लागलीच घरी पोहोचली, Video व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.