छातीवर वळ, तोंडात मोजा…; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?

पुणे नसरापूर भोर गुन्हा: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून (Pune Nasrapur Bhor Crime) संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याचदरम्यान, नसरापूर लैंगिक अत्याचारासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडात मोजा आढळल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय काय? (Pune Nasrapur Bhor Crime)

नसरापूर येथील मुलीच्या लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पाय मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर वळ उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चिमुरडीची किती निर्घृण हत्या करण्यात आली हे समजून आलं आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने शविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय चाचणी देखील केली आहे. सध्या पोलिसांकडून सर्व पुराव्यांची जुळवाजुळ करण्याचे काम सुरु असून लवकरच आरोपपत्र दाखल होऊन या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु होईल. (Nasrapur Bhor Crime News)

नेमकं काय घडलं? (Pune Nasrapur Bhor Crime)

सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. सध्या आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नसरापूर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime)

मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तसे पत्र आम्ही पीडीतेच्या कुटुंबाला दिले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातमी:

Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात….

Pune Nasrapur Bhor Crime: ठेचून मारा, अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका; नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?

आणखी वाचा

Comments are closed.