15 मेपासून उपनगर कॅरम अजिंक्यपद स्पर्धा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विविध खेळांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने येत्या 15 ते 17 मेदरम्यान विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात दहाव्या उपनगर कॅरम अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने रंगणार आहे.

उपनगरातील कॅरमपटूंसाठी प्रतिष्ठेची आणि मानाची स्पर्धा असलेल्या या अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष, महिला आणि विविध वयोगटातील शेकडो स्पर्धक सहभागी होणार आहेत. पुरुष गटातील विजेत्याला 19 हजार रुपये आणि जिल्हा अजिंक्यपदाने गौरविले जाणार आहे. उपविजेताही 11 हजारांच्या रोख इनामाचा मानकरी ठरेल. या स्पर्धेत एकूण 80 हजारांपेक्षा अधिक रकमेचा पुरस्कार खेळाडूंना दिला जाणार आहे. महिला गटातील विजेतीलाही 5 हजारांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच सांघिक स्पर्धेसह 12, 12, 18 आणि 21 वर्षाखालील मुले आणि मुलांचीही स्पर्धा खेळविली जाणार असल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी दिली. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी 8 मेपर्यंत 9769292926 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.