भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?

हरभजन सिंग पश्चिम बंगाल निवडणूक निकाल 2026 वर: पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीत भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आलं. तर तृणमुल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला. 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विविदादपणे राखला होता. मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजपनं बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली. बंगालमध्ये 293 जागांपैकी भाजपने 207 जागा जिंकल्या. पश्चिम बंगालमधील विजयानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि नुकेतच आपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार हरभजन सिंग याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भाजपप्रवेशानंतर हरभजन सिंगने आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र काल पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर हरभजन सिंगने एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले आहे.

बंगालमध्ये नेहमीच अफाट क्षमता राहिली आहे, परंतु अनेक वर्षे ते मागे राहिले. बंगालमधील जनता आता प्रगती, विकास आणि बदलासाठी सज्ज आहे. बंगालचा तेजमय होण्याचा काळ आता आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन…आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं हरभजन सिंग म्हणाला.

हरभजन सिंगचा भाजपमध्ये प्रवेश- (Harbhajan Singh On BJP)

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे 10 पैकी 7 राज्यसभा खासदार राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रमजीत साहनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका असून, या विलीनीकरणाला राज्यसभेच्या सभापतींनी मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ 113 वर पोहोचले आहे

ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा करावा लागला सामना- (West Bengal Election Result 2026)

पश्चिम बंगालमधील भवानीपूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा राजकीय नाट्य रंगताना दिसलं. तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला धक्का बसत असतानाच ममता बॅनर्जींना पराभवाचा सामना करावा लागलाय. टीएमसीच्या एजंटला बाहेर काढल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी जवळपास दोन तास मतमोजणी केंद्रात ठिय्या देऊन बसले होते. सीएपीएफच्या जवानांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अखेर भवानीपूर मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15 हजार मतांनी विजय मिळवला. मतमोजणी उशिरापर्यंत चालल्याचंही चित्र होतं, आणि या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 4 वाजता ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.