Video – टिपेश्वरात ‘टायगर मोमेंट’! वाघ-बछड्याचे थरारक दर्शन, सफारीदरम्यान अचानक समोर; पर्यटकांचा रोमांच शिगेला
यवतमाळ, प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना वाघ आणि त्याच्या बछड्याचे थरारक दर्शन झाल्याने सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरला. उन्हाळी सुट्ट्यांमुळे आधीच पर्यटकांची गर्दी असताना, अचानक समोर आलेल्या या जोडीने काही क्षणांसाठी जंगलात रोमांचक वातावरण निर्माण केले.
सफारीदरम्यान मुक्तपणे वावरत असलेला वाघ आणि त्याचा बछडा पाहताच पर्यटकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. अनेकांनी हा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद केला. काही क्षणांसाठी परिसरात शांतता पसरली होती, तर पुढच्याच क्षणी आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जलस्रोतांकडे वळतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दर्शनांच्या घटना वाढत असल्याची माहिती वनविभागाने दिली.
दरम्यान, पर्यटकांनी जंगलातील नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना वाघ आणि त्याच्या बछड्याचे थरारक दर्शन झाल्याने सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरला.
वाचा सविस्तर : https://t.co/bt8N4UdQL7 pic.twitter.com/sZAFAh1A8j— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 5 मे 2026
Comments are closed.