जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार,व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला बेड्या

जळगाव : नाशिकमधील भोंदू अशोक खरातप्रकरणानंतर राज्यातील काही जिल्ह्यातही महिलांवरील अत्याचार आणि व्हिडिओची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका युवकानेही अशाच प्रकारे मुलींसोबत लैंगिक अत्याचार करुन व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आरोपीस अटक केली आहे. आता, प्रेम प्रकरणातून तरुणीला जाळ्यात ओढत तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (viral video) व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेकडून 7 लाखांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगाव येथील यश जैन या तरुणाला पोलिसांनी (Police) अटक केली. त्यानंतर, तरुणाच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात अजूनही काही तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील लैंगिक अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव यश महेंद्र जैन असे असून त्याला कोर्टात हजर करण्यात आले आहे. चाळीसगावातील तरुणी ब्लॅकमेल प्रकरणात आता नवे तपशील समोर येत आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी यश महेंद्र जैन याच्या मोबाईलमध्ये इतरही काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले की, “तपास सुरू असून काही फोटो व व्हिडिओ आमच्या हाती लागले आहेत. मात्र, याबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच काढता येईल.”

दरम्यान, पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी इतर मुलींना ब्लॅकमेलिंग झाली आहे का?, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी यश जैन याला कोर्टात हजर केली आहे. मात्र, या व्हिडिओ कांडमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बोरिवलीतील खासगी शॉपिंग सेंटरमध्ये दोन मुलींशी गैरवर्तन

बोरिवली येथील एका खासगी शॉपिंग सेंटरमध्ये दोन तरुणींशी कर्मचाऱ्यांनी कथितपणे उद्धटपणे वागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध नोंदवत संबंधित व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. मुंबईत व्यवसाय करताना स्थानिक नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा सन्मान राखणे अनिवार्य असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही प्रांत किंवा भाषेच्या नावाखाली गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, संबंधित व्यवस्थापनाकडून या प्रकरणात योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस

आणखी वाचा

Comments are closed.