मध्य रेल्वेवरील उंबरमाळी आणि आटगाव दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार
अतिक्रमण हटवण्यासाठी पोर्टलच्या बांधकाम कामाकरिता मध्य रेल्वेवरील उंबरमाळी आणि आटगाव दरम्यान बुधवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार 6 मे आणि 7 मे रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होईल.
बुधवारी मध्यरात्री 2.55 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4.10 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे कसारा येथून पहाटे 3.51 वाजता सुटणारी कसारा-सीएसएमटी लोकल 4.20 वाजता सुटेल.
गाडी क्रमांक 20104 भटनी-एलटीटी एक्सप्रेस पहाटे 2.45 ते 4.10 या वेळेत कसारा स्थानकात नियंत्रित केली जाईल. गाडी क्रमांक 11002 बल्हारशाह-सीएसएमटी एक्सप्रेस पहाटे 03:23 ते 04:15 या वेळेत कसारा स्थानकात नियंत्रित केली जाईल.
इगतपुरी स्थानकावर गाडी क्र. 22110 बलहारशाह-एलटीटी एक्स्प्रेस पहाटे 02:55 ते 03:35 या वेळेत नियंत्रिक केली जाईल. तर गाडी क्र. 15101 छपरा-एलटीटी अंत्योदय एक्स्प्रेस पहाटे 03.05 ते 03.40 या वेळेत नियंत्रित केली जाईल.
भुसावळ विभागातील गाडी क्र. 12112 अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि गाडी क्र. 12106 गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेसचे 20 मिनिटांसाठी नियमन केले जाईल. कोणत्याही मेल/एक्स्प्रेस गाड्यांना विलंब झाल्यास किंवा त्यांचे वेळापत्रक बदलल्यास, त्यांचे नियमन परिचालनाच्या सोयीनुसार केले जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक आवश्यक असून, प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगीरी व्यक्त केली आहे.
Comments are closed.