Beauty Parlour : पार्लरच्या चकाकीला भुलताय? योग्य निवड करण्यासाठी वापरा या टिप्स
प्रत्येक स्त्रीला आपलं स्किन केअर रुटीन आणि हेअर मेंटेनन्ससाठी एका चांगल्या पार्लरची गरज असते. मात्र, सध्या गल्लोगल्ली उघडलेल्या पार्लरच्या गर्दीत नेमकं कोणतं पार्लर निवडावं, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. चुकीच्या पार्लरची निवड तुमच्यासाठी महागडी ठरू शकते, कारण पार्लरमधील स्वच्छता, वापरली जाणारी उत्पादने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचे काम या गोष्टी केवळ तुमच्या लूकवरच नाही, तर आरोग्यावरही परिणाम करतात. त्यामुळे स्वत:साठी एक सुरक्षित आणि दर्जेदार पार्लर कसं निवडावं, जाणून घेऊया या बातमीतून.
- पार्लरमधील कर्मचारी प्रशिक्षित आहेत का आणि त्यांना विविध स्किन केअर किंवा हेअर केअर उपचारांचा अनुभव आहे का, याची माहिती घ्यावी.
- जर तुम्हाला त्वचेसाठी विशेष फेस पॅक किंवा केसांसाठी घरगुती उपचारांसारखे नैसर्गिक उपाय हवे असतील, तर त्याबद्दल पार्लरमध्ये सोय आहे का याची चौकशी करावी.
- पार्लरमधील जागा, तेथे वापरली जाणारी टॉवेल्स आणि साधने स्वच्छ आहेत का हे तपासावी.
- कोणतीही ट्रिटमेंट घेताना वापरल्या जाणाऱ्या ब्युटी प्रॉडक्ट्सवरील एक्सपाय.री तसेच त्यातील घटकांची माहिती घ्यावी.
- वापरले जाणारे साहित्य ‘सिंगल युज’ आहे की निर्जंतुक केलेले आहे, याची खात्री करावी.
हेही वाचा – ओffice Wear Mangalsutra :शर्ट असो वा साडी; ऑफिससाठी ही आहेत स्टायलिश मंगळसूत्र
- तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार (उदा. कोरडी त्वचा, ऑईल त्वचा) यासाठी पार्लरमध्ये योग्य स्किन केअर रुटीन किंवा फेशिअल उपलब्ध आहे का, हे पहावे.
- केसांच्या देखभालीसाठी पार्लरमध्ये कोणते ब्रँड्स वापरतात, याची माहिती घ्यावी.
- इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर संबंधित पार्लरबद्दलचे इतर ग्राहकांचे Reviews वाचावेत आणि निर्णय घ्यावा.
- पार्लरच्या सेवांचे दर तुमच्या बजेटमध्ये आहेत का ते तपासावे.
- अनेकदा सणासुदीला किंवा विशेष प्रसंगी पार्लरमध्ये चांगले पॅकेजेस उपलब्ध असतात, तुम्ही निवडलेल्या पार्लरमध्ये अशा ऑफर्स असतात का? हे नक्की तपासावे.
- जुने ग्राहक त्या पार्लरबद्दल काय म्हणतात यावरून देखील निर्णय घेता येईल.
- पार्लरचे वातावरण शांत आणि आरामदायी आहे का नाही ते नक्की बघा, कारण अशा पार्लरमध्ये गेल्यावर तुम्हाला Relax वाटते.
हेही वाचा – Footwear : पायदुखी टाळण्यासाठी कशी असावी तुमची चप्पल?
Comments are closed.