जो जिंकणार तोच ‘टॉपर’, पंजाब आणि हैदराबादमध्ये होणार घमासान
आयपीएलच्या रणांगणात बुधवारी जोरदार घमासान बुधवारी पाहायला मिळणार आहे. कारण पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ बुधवारी मैदानात उतरतील. सर्वांच्या नजरा या सामन्यावर असतील, कारण या लढतीत जो विजयी ठरेल त्यांना नंबर वन होता येणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
पॉइंट्स टेबलची काय आहे स्थिती…
पंजाबच्या संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यांनी सहा लढती जिंकल्या आहेत, तर दोन पराभव त्यांना स्वीकारावे लागले आहेत. पंजाबचा एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 13 गुण असून ते अव्वल स्थानावर आहेत. हैदराबादचा संघ 10 सामने खेळला आहे, यामध्ये त्यांनी सहा विजय मिळवले असून त्यांना चार पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे 12 गुणांनिशी ते दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे हा सामना जो जिंकेल तो संघ अव्वल स्थानावर राहील.
पंजाबला मुंबईकर श्रेयांशकडून अपेक्षा…
पंजाबच्या संघाने सलग सहा सामन्यांत विजय मिळवले होते, पण गेल्या दोन लढतींत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनोली या युवा त्रिकुटाचा आक्रमक दृष्टिकोन आता बेपर्वाईत बदलला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरही फ्लॉप ठरत आहे. पण मुंबईकर श्रेयांश शेडगे गेल्या सामन्यात संघासाठी संकटमोचक ठरला होता. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा संघाला असतील. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, मार्को जेन्सन, युजवेंद्र चहल यांच्या कामगिरीत सुधारणा होणे गरजेचे आहे.
हैदराबादसाठी सुवर्णसंधी…
तिसऱया स्थानावर असलेल्या सनरायझर्स संघाला गेल्या सामन्यात केकेआरकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची संधीही गमवावी लागली. पण ही संधी त्यांच्यासाठी पुन्हा चालून आली आहे. ट्रव्हिस हेड आणि इशान किशन यांचे योगदान वगळता त्यांची फलंदाजी अपयशी ठरत आहे.
Comments are closed.