मंत्री सावेंच्या ‘ओएसडी’ची पत्नी, मुलाला बेदम मारहाण
राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचा ‘ओएसडी’ (विशेष कार्य अधिकारी) म्हणून काम पाहणाऱ्या विजय कारंडे याने आपल्या पत्नी आणि मुलाला बॅटने बेदम मारहाण केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपीची पत्नी रूपाली कारंडे हिने याबाबत तक्रार केली होती. विजयने बॅटने केलेल्या मारहाणीत रूपाली यांच्यासह मुलगा कृष्ण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कारंडे हा नांदेडमध्ये सामाजिक न्याय विभागात कार्यरत असून, सध्या प्रतिनियुक्तीवर मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओएसडी म्हणून कार्यरत आहे. 30 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास तो क्वीन्स गार्डनमधील घरी आला होता. त्यावेळी पत्नी रूपालीने त्याला तीन महिन्यांपूर्वी मोबाइलवर झालेल्या चॅटिंगची विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे विजयने तिला फोडून काढेन असे म्हणत मारहाण केली होती.
Comments are closed.