आईस्क्रीम विकायला घराजवळ आला, नजर फिरली आणि मतिमंद मुलीचा विनयभंग केला; नसरापूर, पर्वती अन् आता

पुणे : पुण्यातील नसरापूर आणि पर्वती भागातील अत्याचाराच्या घटनांनी संतापाची लाट पसरली असताना आता मुळशी (Pune Crime News) तालुक्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील (Pune Crime News) एका गावात दुचाकीवरून फिरत आईस्क्रीम विकणाऱ्या इसमाने मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: घटना कशी घडली

पीडित १४ वर्षीय मतिमंद मुलगी दुपारी २ च्या सुमारास दुचाकीवरून फिरून आईस्क्रीम विक्रीसाठी घराजवळ आलेल्या विक्रेत्याकडे आईस्क्रीम घेण्यासाठी आपल्या लहान चुलत बहिणीसह गेली असता आरोपी पिंटू शिवकुमार सध्या राहणार सूस (ता. मुळशी) जिल्हा पुणेमूळ रा. चिधरवापुर जनखत कन्नौजतीरवा, राज्य, उत्तर प्रदेश याने पीडितेला आईस्क्रीम देत जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा केला आणि ती घरी धावत आली.(Pune Crime News)

पीडितेने घडलेली घटना तिच्या पालकांना सांगितली. त्यावेळी आरोपी घटनास्थळाहून दुचाकी घेऊन पळून गेला. पालकांसह ग्रामस्थांनी परिसरात आरोपीचा शोध घेत त्याला शोधून काढले व आरोपीला पौड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. बरेच आईस्क्रीम विक्रेते, भंगारवाले, फेरीवाले हे परप्रांतीय असून त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकी हे महाराष्ट्रातील आर.टी.ओ क्रमांकाच्या दिसतात. त्यावर पोलिसांनी चौकशी करून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहेत. पौड पोलिसांनी तातडीने गुन्हा रजी.नं.१२३/२०२६,बी. ऐन.एस.७४,लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८,१२ सदर आरोपी वर दाखल करून तपास सुरू केला. माहितीच्या आधारे आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News:  पर्वती भागात आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील पर्वती पायथ्याजवळील (Pune Parvati Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली. 70 वर्षीय आजोबाने सख्ख्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नराधम आजोबावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Parvati Crime News) सदर प्रकरणी चिमुकलीवरील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती समोर आली आहे. नातू आणि नात आरोपी आजोबाला भेटण्यासाठी आले होते. आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये असं सांगितलं. नंतर आरोपीने नातीच्या अंगावरील कपडे काढले आणि स्वतःच्या अंगावरीलही कपडे काढले. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. (Pune Parvati Crime News)

Pune Crime News:  नसरापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं

सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.