वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात येणार ‘बंगाल टायगर’!
पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच रॉयल बंगाल टायगरची जोडी येणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालय, नागपूर येथून ही वाघाच्या नर-मादीची जोडी आणली जाणार आहे. यासाठी पेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या चार होणार असून पर्यटकांसाठी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
Comments are closed.