भाजपने देशभरात कोश्यारी नेमलेले आहेत; तामिळनाडूतील राजकीय पेचावरून संजय राऊत यांची टीका
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एकाही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाने 108 जागा जिंकल्या. 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे टीव्हीकेचा आकडा 113 झाला आहे. त्यामुळे विजयने बुधवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. परंतु राज्यपालांनी बहुमतासाठी आवश्यक 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मागत सत्ता स्थापनेचे आमंत्रण टाळले. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली असून भाजपने देशभरात कोश्यारी नेमले आहेत, अशी टीका केली. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
Comments are closed.