साध्या वेशातील पोलीस, विनाचिन्हांकित गाड्या अन् रात्री छापा; TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खा

नाशिक TCS प्रकरणी निदा खानला अटक नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान (Nida Khan) हिच्या 40 दिवसांच्या पळापळीचा अखेर अंत झाला आहे. नाशिक (Nashik) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. या अटकेचा घटनाक्रम आता समोर आला आहे.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: लपण्यासाठी निवडलं ‘खास’ लोकेशन

निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी अत्यंत नियोजनबद्धरीत्या छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी निवडली होती. हे लोकेशन इतके दुर्गम होते की, ती ज्या इमारतीत लपली होती, तिच्या आजूबाजूला लांबवर एकही घर नव्हते. वर्दळ नसलेला हा निर्जन भाग असल्याने कोणालाही संशय येण्याची शक्यता नव्हती.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: अशा प्रकारे निदा खानला अटक करण्यात आली

नाशिक पोलिसांच्या एसआयटी (SIT) तपासात तांत्रिक माहितीच्या आधारे निदा खान संभाजीनगरमध्ये असल्याची खात्री पटली. यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईचे नियोजन केले. पोलिसांनी सलग दोन दिवस त्या संशयास्पद इमारतीवर लांबून नजर ठेवली. आरोपीला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी गणवेश टाळून साध्या वेशातील पथके तैनात केली होती. कारवाईसाठी सरकारी गाड्यांचा वापर न करता, खासगी आणि विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करण्यात आला. निदा खान घरात असल्याची खात्री पटताच रात्री पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या छापा टाकला आणि निदा खानला ताब्यात घेतले.

नाशिक TCS प्रकरण निदा खानला अटक : एमआयएमचे महापालिकेचे 'कनेक्शन' उघाड

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे निदा खानला लपवण्यासाठी MIM नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केली होती. मतीन पटेलने दोन महिन्यांपूर्वीच कौसर पार्क येथे एक घर विकत घेतले होते, याच घरात त्याने निदा आणि तिच्या कुटुंबाला (आई, वडील, भाऊ आणि आत्या) आश्रय देण्यात आला होता. पोलिसांनी मतीन पटेलचा मोबाईल जप्त केला असून, त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: जामीन फेटाळला अन् ‘गेम’ उलटला

दरम्यान, निदा खानने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच प्रकरणात अटकेत असलेले इतर आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांचीही चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Nashik TCS Case Nida Khan Arrested: टीसीएस धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला लपवून ठेवणारा एमआयएमचा ‘तो’ नगरसेवक कोण?

आणखी वाचा

Comments are closed.