बंगालच्या मंचावर शिंदेंजवळ थांबून मोदींच्या गप्पागोष्टी, शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीपूर्वी स्ट
Narendra Modi मराठी Meet Suvendu Adhikari Oath West Bengal: शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा (Suvendu Adhikari Oath West Bengal West Bengal) पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह एनडीएच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील पोहोचल्या होत्या. यावेळी नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंचावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या एनडीएच्या नेत्यांची भेट घेतली.
नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीने वेधलं लक्ष- (Narendra Modi मराठी Meet)
नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित असणाऱ्या विविध राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना भेटले. मात्र एकनाथ शिंदेंसोबत नरेंद्र मोदी हातमिळवणी करत मंचावर बोलत बसले. नरेंद्र मोदी काहीतरी बोलताच एकनाथ शिंदे जोरजोरात हसले. मंचावर नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांच्यासमोर जास्त वेळ थांबले होते. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान, नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला. शुभेंदू यांनी भवानीपूरमधून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केलाय. त्यांनी 2021 मध्येही ममता यांचा पराभव केला होता.
शुभेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास- (Suvendu Adhikari Political Journey)
जन्म: 15 डिसेंबर 1970, कांथी (Contai), पूर्व मेदिनीपूर
राजकीय सुरुवात : विद्यार्थी राजकारणातून
पक्ष : सुरुवातीला तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress), नंतर भाजप (Bharatiya Janata Party)
2007 : नंदीग्राम आंदोलनामुळे (Nandigram Movement) त्यांना मोठी ओळख मिळाली.
2009 : पहिल्यांदा खासदार म्हणून निवड
2016 : नंदीग्राममधून आमदार
2020 : TMC सोडून भाजपमध्ये प्रवेश
2021 : नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आले.
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-207
तृणमूल काँग्रेस- ८०
काँग्रेस -02
डावे पक्ष- 02
इतर-02
एकूण जागा-293
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.