कामावर पहिलाच दिवस; मुलींना पाण्याची टाकी दाखवतो म्हणून गेला अन्…; उच्चभ्रू सोसायटीत वॉचमनचं
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी (Pune Crime News) घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकानेच (Pune Crime News) चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झाला आहे.(Pune Crime News)
Pune Crime News : चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो सांगून नेलं…
मिळालेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी, ता ८) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन, अशी धमकीही त्याने चिमुरड्यांना दिली होती. आरोपीच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतल्याने या नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.(Pune Crime News)
Pune Crime News : त्या वॉचमनचा त्या सोसायटीतील कामाचा पहिलाच दिवस
या घटनेप्रकरणी गणेश जामदार यांनी माहिती देताना सांगितलं की, एमआयडीसी भोसरी परिसरातील एका सोसायटीमध्ये वॉचमनने एका मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आरोपीला तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मुली अल्पवयीन आहेत, मुलींना वॉचमनने सांगितलं तुम्हाला मी पाण्याची टाकी दाखवतो, असं सांगून तो त्या मुलींना घेऊन वरती ७ व्या मजल्यावरती गेला. तिथे त्याने विनयभंग केल्याची तक्रार मिळाली त्यातील एका मुलीने आईला सांगितलं त्यामुळे घटना उघडकीस आली, त्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहचून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्या वॉचमनचा त्या सोसायटीतील कामाचा पहिलाच दिवस होता. त्याने आधी एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम केलेलं आहे. त्या आरोपीचं वय २५ वर्ष आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.(Pune Crime News)
Pune Parvati Crime News : काही दिवसांपूर्वी पर्वती भागात अत्याचाराची घटना
पुणे शहरातील पर्वतीच्या पायथ्याला 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आला. ७० वर्षांच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने होणारा अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका केली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. नसरापूरनंतर आता या पर्वती भागात घडलेल्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.